मुक्ताईनगरात प्रशासनाला निवेदन ; दडपशाहीचा काळ्या फिती लावून निषेध
मुक्ताईनगर- मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंबई विधान भवनावरील विधान भवन घेराव ठोक मोर्चा सरकार असंवैधानिक पद्धत्तीने व बेकादेशीररीत्या दडपण्याचा प्रयत्न करीत असून विविध ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन दडपण्याचा प्रकार सरकार करीत असून धरपकड तत्काळ थांबवावी व मराठा कार्यकर्त्यांची सुटका करावी या मागणीचे निवेदन मुक्ताईनगर मराठा बांधवांतर्फे तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना देण्यात आले. सरकारच्या दडपशाहीचा हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवण्यात आला. प्रसंगी संतोष पाटील, अॅड.पवनराजे पाटील, भागवत दाभाडे, प्रदीप धमोडे, राहुल शेळके, राहुल पाटील, अरुण पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, कल्पेश पाटील, पिंटू चव्हाण, संदीप पाटील, दिनेश कदम, अजिंक्य पाटील, हर्षल पाटील, ईश्वर रहाणे, मुन्ना कार्ले, राजेंद्र कापसे, बालू पाटील, गोपाळ पाटील, विनोद पाटील, विजय कापसे, निलेश पाटील आदी उपस्थित होते.