वाहतूक ठप्प : मुख्यमंत्र्यांच्या कृतीचा निषेध, पोलिसांचा चोख बंदोबस्त
भुसावळ- तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाजातर्फे बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह शिवस्मारकाची उंची कायम ठेवावी, स्व.काकासाहेब शिंदे यांच्या
वारसांना 50 लाखांची मदत द्यावी व घरातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प राबवावा, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळांना तत्काळ निधी मिळावा, मराठा समाजासाठी तत्काळ हॉस्टेलची सोय करून द्यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी कुर्हा-बोदवड चौफुलीवर सुमारे 15 मिनिटे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या कृतीचा विरोध करीत आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
रस्ता रोकोप्रसंगी संभाजी ब्रिगेड रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष किशोर रोनखेडे, राष्ट्रवादी माजी युवक तालुकाध्यक्ष श्रीकांत बरकले, कुर्हे माजी सरपंच सुभाष पाटील, राजू बावस्कर, युवराज पाटील, राजेंद्र बावस्कर, योगेश पवार, दीपेश पाटील, गोपाल पाटील, योगेश बावस्कर, प्रशांत बोरसे, नितीन पाटील, राहुल धांडे, गणेश बावस्कर, अतुल ओतारी, देवराव पाटील, राहुल निकम, राहुल परदेशी, प्रशांत पाटील, नीलेश उमले, नरेंद्र कोळी, उमेश पाटील, सागर पाटील, किरण पाटील, भूषण चौधरी, एकनाथ पाटील, किशोर पाटील, दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त राखला.