नंदुरबार : आरक्षणासाठी मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंदला नंदुरबार शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने, भाजी बाजार, हॉटेल, रिक्षा आदी सर्वच व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा ,महाविद्यालयात देखील कमालीचा शुकशुकाट दिसून आला. एस.टी. महामंडळाच्या बसेसही बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. शहरातील धुळे चौफुलीवर टायर जाळून ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही ठिकाणी दुकाने बंद करण्यावरून बाचाबाची झाल्याच्या घटना देखील घडल्या.