आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचे रावेर शहरानजीक ठिय्या आंदोलन
रावेर (शालिक महाजन)- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजा तर्फे बर्हाणपूर-अंकल्शेवर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाल्याने चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलकांच्या घोषणाबाजीने परीसर दणाणला आहे.
आंदोलनात यांचा सहभाग
माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष योगेश महाजन, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील कोंडे, शिवसेना तालुकाप्रमुख योगीराज पाटील, विलास ताठे, विनोद पाटील (पातोंंडी), घनश्याम पाटील, दिलीप शिंदे, दुर्गादास पाटील यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संखेने सहभागी झाले आहेत. रावेर पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त राखला आहे.