मराठा समाज आरक्षण : मुक्ताईनगरात रस्ता रोको

0

मुक्ताईनगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील संत मुक्ताई चौकात तेथे तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात सकल मराठा समाजातील हजारो युवकांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती तर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे यांंच्यासह पोलिस निरीक्षक अशोक कडलग व सहकारी पोलिस कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.