वरणगाव- मराठा समाज आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून गुरुवारी शहर बंदची हाक सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली. व्यावसायीकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. वरणगाव बसस्थानक चौकात सकाळी 10 वाजता कायगाव, ता.गंगापूर येथील स्व.काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजातील ज्येष्ठ सोनवणे गुरुजी व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
घोषणांनी शहर दणाणले
समाजबांधवानी पायी मोर्चा काढत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत प्रचंड घोषणाबाजी केली. वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक चौक, फुले मार्केट, गांधी चौक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला तर सायंकाळी पाच नंतर तुरळक ठिकाणी दुकाने उघडण्यात आली.
यांचा आंदोलनात सहभाग
संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, पंकज पाटील, संतोष शेळके, वाय.आर पाटील, मनोज देशमुख , अमोल पाटील, शोभराज शेळके, सदाशीव पाटील, संभाजी देशमुख, सुनील काळे, मिलिंद मेढे, रिंकू सोनवणे, राजेंद्र चौधरी, जगन्नाथ आढाव, नितीन मराठे, नितीन पाटील, शिवाजी पाटील, गजानन पाटील, मिलिंद पाटील, अतुल शेटे, नामदेव पाटील, प्रेमनाथ भोसले, महेश पाटील, समाधान पाटील, सुनील पाटील, बंडू पाटील, वैभव देशमुख, रवींद्र पाटील, शशीकांत पाटील, दीपक देशमुख, प्रशांत निंबाळकर, संजय निंबाळकर, अमोल देशमुख, प्रकाश मराठे, तुषार गांवडे, दीपक चौधरी, पंकज देशमुख, विक्की देशमुख, गोटू देशमुख, संतोष मराठे, निलेश पाटील आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होवू नये म्हणून वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी, हवालदार नागेश तायडे, राहुल येवले, दत्तात्रय कुळकर्णी, महेंद्र शिंगारे, रेशमा मिरगे, वाहतूक पोलिस निकम आदींनी चोख बंदोबस्त राखला.