मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा उत्साहात

0

जळगाव । मराठा सेवा संघ, महाराष्ट्र प्रदेश वधू-वर सूचक मंडळाच्यावतीने रविवारी नूतन मराठा महाविद्यालयात मराठा समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील समाजबांधवांची उपस्थिती होती. मेळाव्यात 80 विवाहोच्छूक उपवरांनी आपला परिचय करून दिला. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे संचालक हेमंत साळुंखे हे प्रमुख वक्ते म्हणून मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बी.टी. देवरे, सचिव एस.एम. पाटील, सुरेंद्र पाटील, आर.बी. घोगवे, प्रा.डॉ. उर्मिला पाटील, खुशाल चव्हाण, प्रकाश भदाणे, गुलाबराव पाटील, भटू पाटील, प्रा. सुनील गरूड, राय पाटील, महेंद्र पाटील उपस्थित होते.