मराठा सामाजिक संस्थेतर्फे वह्या वाटप

0

खालापुर : विद्यार्थ्यांच्या शाळेय शिक्षणांच्या खर्चावर थोडे फार नियंत्रण मिळावे, यासाठी विविध सामाजिक संस्था अग्रेसर आहेत. नुकताच मराठा सामाजिक संस्थेचे संस्थापक विनोद साबळे यांच्या माध्यमातून, रायगड जिल्हा परिषद शाळा माजगाव आणि कोकण एज्युकेशन सोसायटी शाळेमध्ये वह्या वाटपकरण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन स्मितसंकल्प एन्टरप्रायजेस व्यवस्थापक मंगेश पाटील यांनी केले होते. यावेळी 185 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. अनंत लभडे, लक्ष्मण ठाकूर, शशिकांत मोरे, प्रभाकर जाधव तानाजी जाधव, जयेश पाटील, गणेश ढोकले, जितेंद्र पाटील त्याचप्रमाणे संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
यावेळी अनंत लबडे व रायगडभूषण रमेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 9 आँगस्ट रोजी होणार्‍या मराठा मोर्चात सहभागी होण्यासाठी उपस्थिताना आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास माजगाव ग्रामपंचायत सरपंच मथुरा वाघे, उपसरपंच राजेश पाटील, रुपेश जाधव, तुकाराम जाधव, रमाकांत जाधव, रघुनाथ पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत जाधव, रवी पाटील, राजेश ढवाळकर, सुधाकर ढवाळकर, अनंत लबडे, संजय जाधव, राजेश पाटील, सूर्यकांत कांबळे, रवी दिवाने, केंद्रप्रमुख राजन पाटील, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष संजय गायकवाड, माजगाव, वारद व पौदवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व को.ए.सो.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.