ठाणे : मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक दि. ८ आणि ९ एप्रिल असे दोन दिवस रोजी विक्रमगड येथे होत आहे. प्रदेश अध्यक्ष कामाजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक संपन्न होणार आहे.
सदर बैठकीत मराठा सेवा संघाच्या घटनेमध्ये बदल करण्याबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल सादर करणे, विविध कक्षांचे अधिवेशन घेणे, विभागीय प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन व अन्य विषयांवर निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच यावेळी मराठा सेवा संघाच्या सर्व जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. ८ एप्रिलला केवळ मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल तर ९ एप्रिलला मराठा सेवा संघ व इतर कक्षांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य, नियोजन समितीचे सदस्य ३३ कक्षांचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष-सचिव उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी यांनी दिली आहे.