मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम पर्यावरण पूरक

0

जळगाव । जागतिक पर्यावरण दिनाचौ औचित्य साधत मराठी प्रतिष्ठान, पातोंडेकर ज्वेलर्स व इतर संस्थांतर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कडुलिंबाचे झाड लावून सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार सुरेशदादा जैन, आ. राजूमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, पिपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पर्यावरणाचे महत्त्व जाणून करत असलेल्या कामाचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कौतुक केले. संयुक्तपणे शहरात 500 कडुलिंबाची झाडे लावली जाणार आहेत. 5 जून ते 31 ऑगस्ट पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. रस्त्यावरील झाडाची जबाबदारी शहरामधील रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. विजयकुमार रामदास यांनी पर्यावरण जागृती रथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. उपक्रमाकरीता स्वत:चे मालवाहु वाहन 2 महिन्याकरीता विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहे. किरण पातोंडेकर, परेश फाउंडेशनचे प्रमोद बर्हाटे, व विजयकुमार वाणी यांनी सुगंधी फुलांचे रोपटे देऊन जिल्हाधिकार्यांनी
सत्कार केला.

मान्यवर होते उपस्थित
वृक्षारोपण कार्यक्रमाला मेजर नाना वाणी, वर्षा खडके, क्रेडाईच अनिश शाह, गजानन मालपुरे, जितेंद्र मुंदडा, शाम कोगटा, प्रकाश चौबे, लक्ष्मीकांत वाणी, विनोद चौधरी, अमर कुकरेजा, कार्यकारी अभियंता श्री.थोरात, प्रवीण पाटील, फिरोज मुलतानी इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ‍ॅड. जलीम देशपांडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रमोद बर्हाटे यांनी करुन दिला. परेश बर्हाटे, किरण पातोंडेकर यांनी परिश्रम घेतले. विजय वाणी यांनी आभार मानले.