मराठी प्रतिष्ठानच्या स्पर्धेत एमएच.19.व्ही 9095 ‘आदर्श रिक्षा’!

0

जळगाव । मराठी प्रतिष्ठान वतीने जळगाव आदर्श रिक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील रिक्षा चालकांना सम्मान मिळावा वाहतुक करताना प्रवाशाची जबाबदारी रिक्षा चालकाची असते. यासाठी समाजात त्यांचा सम्मान राखला जावा यासाठी स्पर्धेचे आयोजन काव्यरत्नावली चौकामध्ये करण्यात आल्याची माहिती मराठी प्रतिष्ठानचे जमिल देशपांडे यांनी दिली आहे. शहरातील एका आकर्षक रिक्षायावेळी निवड करण्यात आली. सहाय्यक वाहतूक निरीक्षक बर्‍हाटे , वाहतूक अधिकारी वैद्य ,शहर वाहतूक अधिकारी देशमुख ,भारतीय जीवन विमाचे रावेरकर ,नगरसेवक पुथ्वीराज सोनवणे, विद्या फाऊंडेशनचे विनोद चौधरी,मराठी प्रतिष्ठानचे विजय वाणी,प्रमोद बर्‍हाटे ,नरेश चौधरी , रिक्षाचालक व नागरिक उपस्थित होते.

आदर्श रिक्षाचालकाला 5 हजाराचा धनादेश
मान्यवरांच्या हस्ते सहभागी रिक्षा चालकांच्या रिक्षाची तपासणी व परीक्षण करण्यात आले. यामध्ये कागदपत्रे, लायन्स , बीला आणि रिक्षा मधील सुविधांना प्राधान्य देत एकूण 18 रिक्षाचे परीक्षण करण्यात आले. यामधून सचिन भालेराव पाटील यांच्या रिक्षा वाहन क्रं. एमएच. व्ही.19. 9095 हिला प्रथम नामांकन व 5 हजाराचा धनादेश ,स्मुती चिन्ह देऊन सम्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरानाच्या हस्ते सहभागी रिक्षा चालकांना मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार प्रमाणपत्र देण्यात आले. मान्यवरानाच्या वतीने सहभागी स्पर्धकांचे यावेळी कौतुक करण्यात आले आहे.

रिक्षा चालकांचा विमा
रिक्षा चालविताना अनेक वेळा रिक्षा चालक बांधवांचा नजरचुकीने अपघात होतात. दिवस भर कष्ट करीत असताना त्यांच्या जीवाला देखील सुरक्षा मिळावी म्हणून मराठी प्रतिष्ठानचे नरेश चौधरी यांनी सर्व स्पर्धकांचे विमे काढले जाणार असल्याची माहिती दिली. रिक्षा चालकांच्या परिवाराला यामाध्यमातून मदत होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले आपल्या जीबनात संपूर्ण आयुष्य रिक्षा सेवेत घालविणार्‍या जेष्ठ रिक्षा चालकांचे मराठी प्रतिष्ठानच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या वतीने सम्मान व सत्कार करण्यात आला. तसेच दिलीप सपकाळे हे 35 वर्षा पासून रिक्षा चालवीत असल्याने त्याचा सत्कार करण्यात आला आहे.