जळगाव। मराठी प्रतिष्ठानतर्फे ‘आदर्श प्रवासी रिक्षा स्पर्धा 2017’ अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मान्यवीरांच्या उपस्थितीत 5 हजार चे प्रथम बक्षीस ठेवण्यात आले आहे. निवड झालेल्या रिक्षाला रोख रक्कम स्मृती चिन्ह जाणार आहे.जळगाव शहरात हजाराच्या वर रिक्षा असून अनेक रिक्षा अतिशय निटनेटक्या व सुंदर सजावट केलेल्या आहेत. अशा रिक्षांचे चालक व मालक यांना प्रेरणा मिळावी म्हणून मराठी प्रतिष्ठान ने या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जळगाव शहरामधीलच रिक्षाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
सहभागी स्पर्धक रिक्षेचे परिवहन विभागाशी संबधित कागदपत्र उदा. वाहन कर, परवाना, विमा, बिल्ला, फिटनेस, पार्सिंग मुदतीच्या आंत असणे गरजेचे आहे. तसेच वाहन चालक, मालकाचा गणवेश सुद्धा परिपूर्ण असला पाहीजे. रिक्षाची सजावट, नियमानुसार रजिस्ट्रेशन नंबल प्लेट, रिक्षेची स्वच्छता, टापटीपपणा याचे निरीक्षण करून ‘आदर्श प्रवासी रिक्षा 2017’ ची निवड समितीद्वारे केली जाणार आहे. आदर्श प्रवासी रिक्षा स्पर्धेत शहरामधील कोणत्याही प्रवासी रिक्षाला सहभागी होता येणार आहे.