मराठी प्रतिष्ठान लावणार 500 कडुलिंबाची झाडे

0

जळगाव। मराठी प्रतिष्ठानाच्या वतीने तसेच पातोंडेकर ज्वेलर्स,जय किरण प्रभाजी नागरी सह.संस्था, सिद्धी विनायक हॉस्पिटल, स्वर्गीय विजय जगन्नाथ वाणी यांच्या (स्मृती प्रित्यार्थ प्रथमच जळगांव शहरातील 7 वृक्ष प्रेमी संस्था व पर्यावरणप्रेमी एकत्र आल्याने शहरामध्ये 500 कडुलिंबाची झाडे लावणे व जगवणे असा सामाजिक व पर्यावरण दृष्ट्या लाभदायक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मराठी प्रतीष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. 5 जून रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ,कोर्ट चौक येथे झाडे लावून उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे.

झाडाला घेणार दत्तक
चांगल्या गुणवत्तापूर्ण ट्री गार्ड झाडांना लावण्यात येणार असून, प्रत्येक झाडाला ठिंबक प्रणाली चा वापर करून झाडाला दत्तक देण्याची योजना करण्यात आली आहे.या करता प्रथम जळगांव शहरामधील रिक्षा चालक यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शहरामधील मुख्य रस्त्यावर ज्या ठिकाणी रिक्षा चालक नेहमी प्रवास करतात अशा ठिकाणी त्या रस्त्यावर च्या एका झाडाची जबाबदारी रिक्षा चालक घेणार आहे. झाडाच्या ट्री गार्ड वर रिक्षा चालकाचे नाव टाकण्यात येईल.दिवस भरात एकदा त्या झाडाला एक बाटली पाणी देण्याची जबाब दारी रिक्षा चालक घेणार आहे.यामाध्यमातून रिक्षेमध्ये बसलेल्या प्रवाशांना देखील झाडे लावण्याबाबत जागरूकता निर्माण होणार आहे.

पुरस्काराने केले जाईल सम्मानित
झाड उत्तम जगले की त्यांना वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त त्या परिसरातील कोणत्याही वृक्ष प्रेमी नागरिकाला उपक्रमात सहभागी होता येणार असून त्यांनी एका झाडाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. दरवर्षी झाडाचा वाढदिवस देखील साजरा करण्याचे सुद्धा नियोजन मराठी प्रतीष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे. याकरिता वृक्ष संवर्धन समिती देखील तयार करण्यात आली आहे. शहरामधील अधिकाधिक संस्था,नागरिक,वृक्ष प्रेमी,पर्यावरण प्रेमी नागरिक यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.