मराठी प्राथमिक शाळेत प्रवेश उत्साहात साजरा

0

नवापूर। नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शहरातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाची पालखी, प्रभात फेरी काढली. मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वितरीत करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष शाह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका मेघा जाधव,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,संस्थेचे सहसचिव शोएब मांदा,शीला पाटील ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील व पालक उपस्थित होते. अध्यक्ष मनोगतात शिरीष शाह म्हणालेकी शाळा सिद्धी कार्यक्रम अंतर्गत शाळा ’अ’ श्रेणीत आली आहे.या अभिनंदनीय गोष्ठीमुळे प्रमुख पाहुणे व पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश पाटील ,सूत्रसंचालन योगिता पाटील तर आभार माधुरी चित्ते यांनी मानले.यशस्वितेसाठी मनीषा भदाणे, मीना तांबोळी ,करुणा पाटील,रेसा मावची यांनी परिश्रम घेतले.