मराठी बंदीसाठी 12 जूनला कर्नाटक बंद

0

बेळगाव । लोकशाही मार्गाने लढा देणार्‍या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला डिवचण्याचा प्रयत्न कन्नड रक्षण वेदिकेने सुरु केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालून समिती कार्यकर्त्यांना तडीपार करण्याच्या मागणीसाठी येत्या 12 जूनला कर्नाटक बंदची हाक देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठीची मागणी करणार्‍याना आणि कन्नड न येणार्‍याना येथून हाकलून लावा, अशी अनाठायी मागणीही केली आहे. 50 कार्यकर्ते आणि 200 पेक्षा अधिक पोलिसांचे कवच घेऊन दाखल झालेल्या वाटाळ नागराज आणि कन्नड कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने केली आणि त्यानंतर वरील मागणी केली आहे.