भावस्पर्शी मखमली आवाजाने सजलेली अनेक गाणी अजरामर करणारा मराठी भावगीतांचा शुक्रतारा आज निखळला. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. दिस नकळत जाई,’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ’या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ’शुक्र तारा मंद वारा’, ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’, अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. हा शुक्रतारा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अरूण दाते यांचे निधन झाले आहे. मराठी मनाला अनेक वर्ष तृप्त करणारा हा गायक होता. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे. मराठी गाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यांचे गीत, त्यांचे शब्द मराठी रसिक कधीही विसरू शकत नाही. त्यांना अमेरिकेतील तुल्सा सिटीने मानद सदस्यत्वही दिले होते. त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आले होते. संगीतासोबतच त्यांनी टेक्सटाइल इंजिनीअरची पदवी प्राप्त केली होती. बिर्ला उद्योगसमूहात त्यांनी नोकरी केली होती.
मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाने सजलेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः ’भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ’या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ’शुक्र तारा मंद वारा’, ’स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’, अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत. हा शुक्रतारा आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे. अरुण दाते यांच्या जाण्याने ‘शुक्रतारा निखळला’ असेच प्रत्येकाच्या तोंडून निघाले. मराठी भावगीतांच्या विश्वामध्ये अरुण दाते यांनी गायलेले हे गाणे म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे. ‘आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पाहा.’, असे म्हणत अरुण दाते यांचे सूर जेव्हा आपल्या कानांवर पडतात तेव्हा आपल्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसोर येतोच. अशी आहे या सुरेल आवाजाच्या गायकाची जादू. ‘शुक्रतारा मंद वारा’ हे गाणे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये समाविष्ट केले जाते. एकांत, प्रिय व्यक्तीची आठवण आणि या वातावरणात वाजणारे हे सुरेख गाणे म्हणजे क्या बात असे म्हणणारी तरुण पिढीसुद्धा काही कमी नाही. या गाण्याच्या ध्ननिमुद्रणाच्या वेळेचा किस्सा काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान खुद्द अरुण दाते यांनी सांगितला होता. त्यांनी या गाण्यासोबतच्या ऋणानुबंधांविषयीसुद्धा सांगितले होते. ‘मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि मी व सुधा मल्होत्रा यांनी गायलेल्या ‘शुक्रतारा’ या गाण्याने मला भरभरून दिले.
मराठी भावसंगीत आणि गायनाचा माझा नवा प्रवास या गाण्याने सुरू झाला’, असे ते म्हणाले होते. ‘शुक्रतारा मंद वारा’ या लोकप्रिय गाण्याला 5 मे रोजी 56 वर्षे पूर्ण झाली. या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी गाण्याचे गीतकार मंगेश पाडगावकर आणि संगीतकार श्रीनिवास खळे हे उपस्थित होतेच. पण या दोघांसह अभिनेते, संगीतकार आणि हार्मोनियम वादक गोविंदराव टेंबे, अरुण दाते यांचे वडील रामुभय्या दाते, अरुण दाते यांचे काका रवी दाते, अरुण दाते यांचे पारसी मित्र उनवाला, अनिल मोहिले संगीत संयोजक म्हणून आणि पु. ल. देशपांडे उपस्थित होते. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते हे त्रिकूट प्रचंड गाजले. दोनच दिवसांपूर्वी अरुण दातेंचा 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. 28 वर्षे टेक्स्टाइल इंजिनीअर म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी संगीत क्षेत्रात पूर्णवेळ झोकून दिले. त्यांचे वडील रामूभय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायनाकडे वळले. इंदूरजवळील धारमध्ये कुमार गंधर्वांकडे ते सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. मंगेश पाडगावकरांचे शब्द, श्रीनिवास खळेंचं संगीत यांनी सजलेल्या ’शुक्रतारा मंदवारा’ या गाण्यातून अरुण दाते खर्या अर्थाने नावारूपास आले. पुढे दाते आपल्या कार्यक्रमांमध्येही ‘शुक्रतारा’ गाऊ लागले. 2010 पर्यंत अरुण दाते यांनी शुक्रतारा या नावाने मराठी भावगीत गायनाचे अडीच हजारांहून अधिक कार्यक्रम केले. त्यानंतर 1955 पासून आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर लक्ष केंद्रित केले. 1962मध्ये अरुण दाते यांच्या शुक्रतारा मंदवारा या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. ‘शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी”येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील”भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’.’दिवस तुझे हे फुलायचे”अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी’ आणि ‘या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे’, अशा हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य केले.
अरुण दाते यांचे उर्दू आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक अल्बमही लोकप्रिय झाले आहेत. ‘शतदा प्रेम करावे’ या नावे लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र 1986 मध्ये प्रसिद्ध झाले होते. 2016 मध्ये हे पुस्तक पुनर्प्रकाशित करण्यात आले. दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, कविता कृष्णमूर्ती यांच्यासोबत अनेक द्वंद्वगीते गायली आहेत. संगीतकाराने संगीतबद्ध केलेल्या पद्धतीतच गाणे गायचे ही त्यांची खासियत होती. ते तसेच प्रत्यक्षात गळ्यातून ते उतरवायचे. म्हणूनच महाराष्ट्रातील संगीत विश्वात त्यांची वेगळी ओळख राहिली आहे. भावस्पर्शी मखमली आवाजाने सजलेली अनेक गाणी अजरामर करणारा मराठी भावगीतांचा शुक्रतारा आज निखळला. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. मराठी मनाला अनेक वर्षे तृप्त करणारा हा गायक होता. त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे.
मराठी गाण्यासाठीच जणू त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्यांची गीत, त्यांचे शब्द मराठी रसिक कधीही विसरू शकत नाही. त्यांना अमेरिकेतील तुल्सा सिटीने मानद सदस्यत्वही दिले होते. त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यातही आले होते. संगीतासोबतच त्यांनी टेक्सटाइल इंजिनीअरची पदवी प्राप्त केली होती. बिर्ला उद्योगसमूहात त्यांनी नोकरी केली होती. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही, असे म्हणत हा सुराधीश आपल्यातून निघून गेला. त्याच्या स्वरांना भावपूर्ण आदरांजली!