मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन

0

लोणावळा : जागतिक मराठी भाषा दिन व कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त लोणावळा महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा. बच्छाव म्हणाले मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याकरिता सर्वत्र मराठी भाषेचा वापर व्हायला हवा. शासकीय व्यवहार व लेखनांकरिता मराठीचा वापर झाल्यास मराठीचा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. युवकांनी याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जे.ओ.बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लतिका बळी, गितांजली माळी, एन.बी. चौधरी, संजय लांडगे, सुवर्णा मित्रा, पदमिनी माने, ग्रंथालय विभागप्रमुख चांगुणा ठाकर, श्रीकांत होगले व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. रविंद्र कडू यांनी मराठी भाषा व कवी कुसुमाग्रज यांच्यातील नातेसंबंध स्पष्ट केले. तर प्रा. राजेंद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर करण्याकरिता कोणते अ‍ॅपस व सॉप्टवेअर उपलब्ध आहेत याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गरुड यांनी केले तर प्रगती कडू या विद्यार्थीनीने आभार मानले.