मराठी भाषेचा वापर न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन

0

पिंपळनेर । साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकात रिजर्व बँकेच्या नियमानुसार प्रत्येक राज्याच्या मातृभाषेनुसार बँकेचे कार्यालयीन कामकाज करावे असा आदेश असतांना बँकेमधील व्यवहारमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर करण्यात येत असल्याने आंदोलनाचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला आहे.

मराठी भाषेची हेळसांड
मराठी अस्मितेची व मराठी भाषेची होत असलेली हेळसांड व मिळत असलेली दुय्यम वागणूक मनसे हे कदापी सहन करणार नाही. तरी दहा दिवसात बँकेच्या शाखेतील दैनंदिन व्यवहारात असणारे कागदपत्र नविन खाते उघडण्याचे अर्ज, पैसे काढण्याचे व भरण्याचे अर्ज व इतर कागदपत्र तसेच बँकेच्या एटीएममध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. अन्यथा मनसेच्यावतीने आपण महाराष्ट्राच्या मराठी राज्यभाषेचा अपमान करित आहात असे समजून आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनसेचे तालुका अध्यक्ष शिवा जिरेपाटील. शहर अध्यक्ष स्वामी खरोटे, योगेश पाटील, किरण नांद्रे, धिरज देसले, बाबा बच्छाव, प्रशांत गांगुर्डे, शुभम तोरवणे, गुड्डू मालुसरे, दिपक गांगुर्डे, अक्षय एखंडे, राकेश मांडोळे, गोविंद मिरेकर, आदि उपस्थित होते.