मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये काळाशी झगडण्याची नैसर्गिक ताकद

0

बोर्ली । मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये काळाशी झगडण्याची नैसर्गिक ताकद असल्याने ते पुढे चांगले चमकतात. तर इंटनेटच्या युगात विद्याार्थ्यांनी इंटरनेटचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केल्यास त्याचा निश्‍चितच फायदा होईल. असे प्रतिपादन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी केले. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अर्थातच बालदिनाचे औचित्य साधून येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आपल्या विद्यार्थी दशेच्या काळामध्ये रस्त्यामध्ये रोडरोमीओंसारखे न फिरता आपल्या विद्यालयाच्या सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये नावलौकिक कसा साधता येईल यासाठीच प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रयत्न केले पाहिजेत.

आयुष्याची वाटचाल ठरविणे गरजेचे
आपल्या आयुष्यामध्ये मजा करतानाच इयत्ता 8 वी ते 9 वी पासूनच आपल्या करिअर बाबत प्रत्येक विद्यार्थ्यांने गांभीर्याने विचार करून पुढील आयुष्याची वाटचाल ठरविणे गरजेचे आहे. शालेय शिस्त पाळली तरच आपण निश्‍चितपणे यशस्वी होवू शकतो असा सल्लाही सोनके यांनी विद्याथ्यांना दिला. या कार्यक्रमास पोलीस उपनिराक्षक पराग लोंढे, जनता शिक्षण संस्था सचिव श्रीराम तोडणकर, प्राचार्य जालींदर पोटे, उपमुख्याध्यापक विठ्ठल कोळकर, पर्यवेक्षक तानाजी गायकवाड, पोलीस कर्मचारी निलेश सोनावणे, संतोष जाधव, दिनेश घाडगे, सौ चव्हाण याव्यतिरीक्त शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.