मराठी राजभाषा दिन साजरा

0

पुणेः माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी विद्यालयात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी शाळेत मराठी वाचन स्पर्धा तसेच शिक्षण विवेक मासिकातर्फे सांगू का गोष्ट? ही कथाकथन स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याचा प्रमुख पाहुण्या व शाळा समिती अध्यक्ष यांच्या हस्ते बक्षिसे देऊन बक्षीस समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमथ पाहुण्या म्हणून उज्वला जोगळेकर शाळा समिती अध्यक्ष डॉ.खी.सुजील मंडगे सर उपस्थित होते. मुख्याध्यापिका द्यालेवाडीकर व पर्यतेक्षक दिक्षसकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरूवात इ.7 वी च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे कौतुक करणारी कविता सादर करून केली. कार्यक्रमाचे प्रास्तविक ज्येष्ठ शिक्षिका महाजन मॅडम यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून केले. तसेच पालकांतर्फे देण्यात येणारा गुणवंत विद्यार्थी पुरस्कारही पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी वाचन स्पर्धेच्या परीक्षक गंजिरी जोशी यांनी मराठी वाचनासंदर्भात मार्गदर्शन केले. इ.4 थी तील सृजा घाणेकर व इ.7 वी तील कल्याणी भांडारी या विद्यार्थिनींनी आदर्श वाचन कसे करावे हे प्रकटवाचनाने सादर केले केले. तसेच इ.7 वी तील अर्जुन अभ्यंकर याने इंग्रजीतील वाचन सादर केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष भंडगे सर यांनी मुलांचे कौतुक केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कुलकर्णी वआभार प्रदर्शन अंजली पवार यांनी केले.