जळगाव। मराठी विज्ञान परिषद जळगाव, विभाग जळगाव या संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत, त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. जळगाव पिपल्स बँक मुख्य. शाखा जळगाव येथील भवरलाल जैन सभागृहात पार पडली. अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी सभेची प्रस्तावना केली व किशोर महाजन यांनी निवडणूक व्यवस्थापक म्हणून काम बघितले.
यांची करण्यात आली निवड
या निवडणूकीत नऊ सदस्यांची निवड करावयाची होती. त्यात खालील सदस्य बिनविरोध निवडून आले. तसेच कार्यकारिणीमधून पदाधिकार्यांची निवड करण्याकरीता बुधवार 23 ऑगस्ट रोजी निवडणूक व्यवस्थापक किशोर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन त्यात कार्यकारिणीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. भालचंद्र प्रभाकर पाटील अध्यक्षपदी, श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी उपाध्यक्षपदी, शशिकांत पितांबर नेहेते कोषाध्यक्षपदी, दिलीप शंभर भारंबे कार्यवाहकपदी, माधुरी अतुल कोल्हे- सहकार्यवाहक, उमेश रामहरी इंगळे- प्रकल्प प्रमुख, रविंद्रसिंग अमरसिंग पाटील – कार्यकारिणी सदस्य. मोहन रामचंद्र कुळकर्णी, राजेश भागवंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच निवड झालेल्या पदाधिकार्यासह सदस्यांना अभिनंदन करण्यात आले असून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे. यावेळी सभेस मोठ्या प्रमाणात सभासदांची उपस्थिती होती.