मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघाचे पाऊले चालती’

0

मुंबई : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर जसा नाटय् निर्मात्यांचा निर्माता संघ आहे, तसाच मराठी वाद्यवृंदाच्या निर्मात्यांनी आपला निर्माता संघ स्थापन केला आहे. चार वर्षे ही संस्था कलावंतांच्या प्रश्नावर काम करताना दिसत आहे. नुकताच आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर संस्थेने शिवाजी मंदिरात ॠपाऊले चालती’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे वैशिष्टय् हे की तो कार्यक्रम कलावंतांच्या वैद्यकीय मदतीकरिता होता. तसेच प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जीवनगौरव पुरस्काराने या कार्यक्रमात गौरवण्यात आले.

निनाद आजगावकर, गीता बापट, नीलिमा पुराणिक, रश्मी लुकतुके, नरेंद्र कोठंबिकर, अमृता दहिवेलकर, चंद्रकांत शिंदे, आकांक्षा घटके, रमेश राणे, रवींद्र अहिरे, दर्शन साटम, सचिन आगवणे, आणि श्रद्धा साळवी या गायक – गायिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शैलेश आंबेकर, चंद्रकांत पांचाळ, संतोष मोहिते, गणेश मेस्त्री, हरीश कांबळे, गोविंद हडकर, राजेश चिखलकर, दीपक गायकवाड, रवी पवार यांची त्यांना साथसंगत होती. ॠपाऊले चालती’ या कार्यक्रमाचे निरुपण परेश दाभोळकर आणि कविता नाईक यांनी केले. ज्येष्ठ वादक, गायक यांना कलागौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. ॠपाऊले चालती’ या विठ्ठल भक्तिपर गीतांच्या कार्यक्रमाचे प्रयोग होणार असून सुशील आंबेकर आणि बाळा पांचाळ हे त्यासाठी कटिबद्ध आहेत. रसिकांना ही एक सांगितिक मेजवानी मिळणार आहे.

नाटय्लेखन कार्यशाळा म्हणजे व्यवसाय आहे का ?
हल्ली नाटय् शिबिरे महाराष्ट्रात मुबलक होताना दिसत आहेत. त्यांच्या जाहिराती तर हल्ली नाटकांपेक्षा जास्तच दिसतात. खरोखरच अशा शिबिरातून नक्की नाटकांच्या सर्व अंगांचे शिक्षण मिळते का, हा खरा प्रश्न आहे. तसे असेल तर पुण्याची ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाचा नाटय्शास्त्र विभाग हा हवाच कशाला? नाही, त्याचे काय आहे शिबिरे नाही घेतली तर घेणार्यांचे पोट कसे भरणार?. जाऊ द्या न झालं, आपल्याला काय करावयाचे आहे. अखिल भारतीय नाटय् परिषदेने नाटय्लेखन कार्यशाळा घेण्याचे घोषित केले आहे. तसे ते 2 ते 3 वर्षांपासून कार्यशाळा घेत आले आहेत. नाटय्बीज ते संपूर्ण व्यावसायिक नाटकं या कार्यशाळेत शिकविली जाणार आहेत. पहिले सत्र 6 ते 13 ऑगस्ट आणि दुसरे सत्र 11 सप्टेंबर या कालावधीत घेतले जाणार आहे.