पुणे : गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला कर्तव्य फाउंडेशन तर्फे आयोजित मराठी सन्मान सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कर्नल संभाजी पाटील, मोहन दूधाणे,राम बांगड, पो.निरीक्षक वैशाली चांदगुडे, नगरसेवक दिलीप गिरमकर, बापूसाहेब गानला,विकास भांबुरे, सुशील खंडेलवाल,अशोक देशमुख, मिलिंद अहीरे आदी उपस्थित होते.
फाउंडेशनतर्फे सिध्दार्थ ग्रंथालयास श्रीमती आम्रपाली धर्मपाल कांबळे यांच्या हस्ते पुस्तके भेट देण्यात आली. मराठी सन्मान सोहळ्याच्या सन्मार्थीमध्ये अर्जुन राठोड(समाजसेवाअधिक्षक,ससून रूग्णालय), स्मिता पोळ(ग्रंथपाल, आवाबेन ग्रंथालय),अब्रार कुरेशी(अध्यक्ष-जमैतुल कुरेश ट्रस्ट),अनुराज सोनवणे(निमंत्रक-रक्ताचे नाते ट्रस्ट) ,पंकज पासलकर(मराठी व्यवसायिक)व मोहीनी मोहीते(मराठी पत्रकार) आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर दिलीप भिकुले यांनी आभार मानले. सचिन कांबळे, गणेश शेलार, महेंद्र कांबळे, अय्युब खान,हसन रंगरेज,असलम शेख आदींनी कार्यक्रम यशस्वी केला. कर्नल पाटील, दुधाणे, बांगड, गिरमकर यांनी आपल्या मनोगतातून सन्मानार्थींच्या कार्याचे कौतुक केले व फाऊंडेशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.