मुंबई । मराठी चित्रपट सृष्टीतील एकापेक्षा एक दर्जेदार अशा मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत मानाचे स्थान मिळून आपला मराठी चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सबमिशन सेल असे विभाग सुरू केले आहेत. याविषयी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाने पुढाकार घेऊन मराठी निर्मात्यांसाठी सिनेमा विकण्यासाठी अजून एक नवीन दालन खुले केले आहे.
या वर्षी ‘कान्स’ येथे 3 एप्रिल ते 6 एप्रिल 2017 ला भरणार्या ‘कान्स मीप (चखझ) टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भाग घेणार आहे. यासाठी या संचालक चैत्राली डोंगरे यांची निवड झाली असून, इंटरनॅशनल फिल्म सेलच्या मुख्य व्यवस्थापिका निलकांती पाटेकर यांना कांसला पाठवणार आहे. कुठल्यातरी इंटरनॅशनल फिल्म मार्केटमध्ये महामंडळ प्रतिमाच आपला सहभाग नोंदवणार असून, महामंडळाद्वारे देशोदेशीचे बायर्स यामुळे मराठी निर्मात्यांना उपलब्ध होणार आहे. आताच्या डिजिटल युगामध्ये वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या टेरिटरीजसाठी तर्हेतर्हेचे हक्क विकले जाऊ शकतात.
मार्केट सेलमध्ये नोंद करण्यासाठी..
’कान्स मीप (चखझ) टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या बाजारपेठेत चित्रपटांवरील हक्कांच्या विक्रीसाठी इच्छूक असल्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात इंटरनॅशनल फिल्म मार्केट सेलमध्ये नोंद करावी. ह्यासाठी चित्रपटाला इंग्लिश सब टायटल असणे आवश्यक आहे. ह्या संदर्भातील अधिक माहितीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयात अथवा ळपींशीपरींळेपरश्रषर्षीीलाळीीळेपसारळश्र.लेा येथे संपर्क साधावा, असे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
– खालील साहित्य व फॉरमॅट गरजेचे
– संपूर्ण सिनेमा (इंग्लिश सब टायटल) चझ4 षेीारीं
– फिल्मचा ट्रेलर (चझ4 फॉरमॅट)
– डिजिटल ब्रोशर पोस्टर
– वर्किंग स्टील्स
– सिनोप्सीस (150 शब्द)
– प्रोड्युसर्स नोट फोटो सहित
– डायरेक्टर्स नोट फोटोसहित
– फिल्मओग्राफी (प्रोड्युसर डायरेक्टर)
– कॅमेरामन नोट
– संकलक नोट