मराठे येथील सैनिकाने घेतला गळफास

0

चोपडा । तालुक्यातील मराठे येथील रहिवासी असलेले व भोपाल येथील मिल्ट्री कॅम्पमध्ये नोकरीस असलेला मात्र रजेवर गावी आलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवानाने रविवारी अनेर धरणाच्या खाली स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

तालुक्यातील मराठे येथील रहिवासी असलेल्या व भोपाळ येथील 115 इंजिनीयरिंग कमांडो गाडीवर चालक असलेला राकेश मिठाराम मिस्तरी(वाघ)(35)याने रजा घेऊन सुट्टीवर आलेल्या जवानाने रविवारी 20 रोजी संध्याकाळी सात वाजेपुर्वी मराठे शिवारातील आपल्या वडिलोपार्जित शेतातील लिबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मयताच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून त्यात मयत झाल्यानंतर कुणाकडून किती, कसे पैसे द्यावे असे लिहून ठेवल्याचे पोलिसांनी सांगितले त्याच्या पश्‍चात वडील, आई, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी असल्याने परिवार उघड्यावर आला आहे जवानाने आत्महत्या का केली असावी याचा तपास पोलीस करीत आहेत.