जळगाव । शहरात 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत मर्यादेपेक्षा अधिक डेसीबलने डी.जें.वाजविणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यात शहर पोलिसांनी दोन डी.जे.वर गुन्हा दाखल केला असून शनिपेठ पोलिसांनी एक डी.जे.चे वाहन ताब्यात घेतले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त शहरात शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री 1 पर्यंत मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीमध्ये डी.जे.ला मनाई करण्यात आलेली असतानाही डी.जे.वाजविण्यात येत होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मयार्दपेक्षा अधिक आवाजात डी.जे.वाजविणारी तीन वाहने पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतली.
शहर पोलिसात गुन्हा
शहर पोलिसांनी डी.जे.मालक देवा हिरामण गांगुर्डे, अजय लक्ष्मण गरूड, सुनील प्रेमराज सपकाळे, शेख इम्रान अख्तार यांची दोन वाहने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सहाय्यक निरीक्षक महेश जानकर करीत आहे. शनिपेठ पोलिसांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डी.जे.चे एक वाहन ताब्यात घेतले आहे. डी.जे.सह पवन सतिष फुलपगारे यास मालक म्हणून निष्पन्न करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.