मलकापूरात युवकाचा निर्घूण खून

0

मलकापूर- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 25 वर्षीय इसमाचा धारदार शस्त्र डोक्यात मारून खून करण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. गजानन मारूती बोरकर (25) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक अंबादास हिवाळे व सहकार्‍यांनी धाव घेतली.

वादातून खुनाचा संशय
मयत बोरकर व संशयीत आरोपी सुरज अनंता इंगळे (कुर्‍हा) यांच्यात शनिवारी रात्री वाद झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले होते मात्र सुरजने तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुन्हा उभयंतांमध्ये जुन्या कॉटन मार्केटच्या आवारात झटापट होवून बोरकर यांचा मृत्यू झाला. हा खून सुरज यांनी केल्याचा दाट संशय पोलिसांना असून तो सार झाल्याने त्याचा कसून शोध घेतला जात आहे.