मलकापूर येथे अपघात; तीघांचा मृत्यू

0

भुसावळ । भुसावळ येथून मलकापूरला जात असताना स्कॉर्पिओ गाडीला मलकापूर येथील अमन ढाब्याजवळ अपघात होऊन भुसावळ येथील तीन जण ठार तर चार जखमी झाल्याची घटना मंगळवार 7 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.

येथील माजी नगरसेवक आरीफ गनी यांची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम.एच.19, एएफ- 9130 याने मलकापूर येथे आपल्या काही पारिवारिक कामानिमित्त जात असताना टायर फुटल्याने यात वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक अफजलखान सलीम खान यासह जुनियाबी शेख मुस्ताफ, मुदफीर इम्रान खान या चिरमुरड्यांचा मृत्यू झाला. तर नाजीयाबी फातुम इद्रीसखान, तब्बसुम परवीन इरफान खान, नसीमबी शेख सलीम, इद्रीस खान अहमद खान हे जखमी झाले आहेत. याबाबत मात्र मलकापूर एमआयडीसी पोलीसात केवळ दोन व्यक्तींच्या मृत्यूची नोंद केली आहे.