मलांजन येथे मकाचा चारा जळून खाक

0

10 ते 12 ट्रॅक्टर चारा आगीत जळून खाक झाल्याचा अंदाज

पिंपळनेर – साक्री तालुक्यातील मलांजन येथील सुनील माधवराव सोनवणे यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही गावकऱ्यांनी जवळच्या विहिरीतुन पाणी आणून विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग इतकी भीषण होती. ती विझवणे शक्य झाले नाही, तर साक्रीहुन नगरपालिकेच्या अग्निशामक बंबला पाचारण करण्यात आले व आग आटोक्यात आली. जवळच चार ते पाच शेतकऱ्याचे कांदा चाळ व चारा होता तोही नष्ट झाला असता सुदैवाने तो वाचला. तलाठी एम.एस.अहिरे यांनी पंचनामा केला अंदाजे 10 ते 12 ट्रॅक्टर चारा आगीत जळून खाक झाला चाऱ्याची किंमत 40 ते 50 हजार रुपये इतकी गावातील ग्रामस्थनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.