मलाही त्या कॉम्प्रमाईज साठी ऑफर आली होती

0

मुंबई । फिल्म इंडिस्ट्रीत कास्टींग काऊच हा किळसवाणा प्रकार असून  अशा कॉम्प्रमाईजसाठी आपल्याला ऑफर आली होती अशी कबुली ज्येष्ठ सीने अभिनेत्री अलका कुबल यांनी दिली. मात्र आपण ती तत्काळ धुडकावून लावली, अशा त्या म्हणाल्या. तेलुगू चित्रपटसृष्टीत करिअरसाठी धडपडणारी अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठवला. त्यांनतर आता मराठी चित्रपट सृष्टीतही मोठ्या तारकांना या प्रकाराला कधी ना कधी सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कुबल आणि मृण्मयी देशपांडे या दोघींनीही याबाबतचे आपले अनुभव कथन केले आणि आपण ते धुडकावल्याचे एका चर्चेत सांगितले. त्यामुळे या प्रकारावर प्रकाश पडला आहे.

तसे काम नको होते
वयाच्या 15 व्या वर्षीच, असा प्रकार घडला होता, असे अलका कुबल म्हणाल्या. मला अशा पद्धतीने काम मिळवायचे नव्हते. मला अशा माणसांसोबत कामच करायचे नव्हते, असे त्या म्हणाल्या. त्याआधी अभिनेत्री गिरीजा ओक हिनेही मराठी चित्रपटसृष्टीत असे प्रकार घडत असल्याचे म्हटले होते.आत हा विषय सगळीकडे चर्चेचा झाला आहे.

हैद्राबादमध्ये कंटाळून श्री रेड्डीने उतरवले कपडे
दोनच दिवसांपूर्वीे हैदराबादेत श्री रेड्डी या अभिनेत्रीने रोलच्या बदल्यात दिग्दर्शकाने आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. याचा निषेध म्हणून सार्वजनिक ठिकाणी तिने आपले कपडे उतरवले होते. मी वयाच्या पंधराव्या वर्षी इंडस्ट्रीत आले. मलाही माझ्या तरुणपणात असे अनुभव आले. मलाही विचारण्यात आलं होतं, मॅडम तुम्ही कॉम्प्रमाईज करायला तयार आहात का? असाल तर तुम्हाला ही फिल्म मिळेल. ही त्या काळातली घटना आहे. आज मला फिल्म इंडस्ट्रीत येऊन जवळपास 35 वर्ष झाली आहेत.मी अशा ऑफर धुडकावून लावल्या. मी ठामपणे नकार दिले, असे अलका कुबल यांनी सांगितले.