मुंबई:माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे त्यांच्या जीवनावरील आत्मचरित्र लिहित आहेत. लवकरच त्याचे प्रकाशन होणार होते. शिवसेना सोडण्याच्या कारणासह अनेक गोप्यस्फोट ते या आत्मचरित्रातून करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना पक्षात ठेवल्यास पत्नी रश्मी ठाकरे यांना सोबत घेऊन घर सोडेल अशी धमकी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिली होती असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
शिवसेनेत असतांना कोणी-कोणी त्रास दिला याचा उलगडा ते आत्मचरित्रातून करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी माझे वैर नाही परंतु मतभेत असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले आहे.