मुंबई: राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. दोन दिवसीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. पुरवणी मागण्यांवर आज मंगळवारी १५ रोजी चर्चा सुरु आहे. माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुंगटीवार पुरवणी मागण्यांवर बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीतील एका आमदाराने हस्तक्षेप केला. यावर सुधीर मुंगटीवार यांनी ‘मी सभागृहात बोलत असताना मला जर कोणी रोखले तर पुढील वेळी ती व्यक्ती आमदार म्हणून निवडून येत नाही’ असे मिश्कीलपणे सांगितले, यावर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ‘मी तुमच्या आड येतो, मला पाडून दाखवा’ असे आव्हान दिले. यावरून सभागृहात चांगलाच हशा पिकला.