मुंबई-२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे चाहूल लागले आहे. इच्छुकांची आतापासून तयारी सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी २०१९ मध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणार नाही असे विधान केले आहे. मुंबईत आजतक या वृत्तवाहिनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
२००४ मध्ये ज्याप्रमाणे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते, निवडणुकीनंतर काही पक्षांचा पाठिंबा घेऊन डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान बनले तशीच परीस्थित २०१९ मध्ये असण्याची शक्यता आहे असे पवार म्हणाले.
प्रत्येक राज्यात भाजप विरोधात वेगवेगळे पक्ष उभे राहत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर फेकला जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.