मल्टीप्लेक्सच्या जमान्यात टुरिंग टॉकीजला अस्तित्व टिकवणे झाले कठीण

0

एरंडोल (रतिलाल पाटील) । जग 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. त्यातच विज्ञानामुळे मानवाने अधिक प्रगती केली आहे.त्यातच डिजिटल माध्यमाने जगाला वेड लावला आहे अशा आधुनिक मनोरंजनाच्या माध्यमांमुळे परमापारिक मनोरंजनाच्या माध्यमांना लोक विसरत चालले आहे. एकेकाळी गावांमध्ये तथा तालुक्यामध्ये यात्रा हा प्रकार लोकांमध्ये उत्साह आनंद व मनोरंजनाचे महत्वाचे मध्यम होते. परंतु बदलत्या काळा व बदलत्या परिस्थिती नुसार या परमापारिक मनोरंजन माध्यमांना हवा तेवढा वाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यातच म्हणजे टुरिंग टाकीज होय.

टुरिंग टॉकिजचा होत होता 15 दिवसांचा मुक्काम
पूर्वीच्या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी ग्रामीण भागात व तालुक्याच्या ठिकाणी यात्रा उत्सवासाठी व तमाशा व टुरिंग टाकीज हे करमणुकीचे साधने मानली जायची. तमाशा एक किंवा दोन दिवस असायचा, परंतु टुरिंग टाकीजवाले यात्रेच्या पंधरा दिवस अगोदर व पंधरा दिवस नंतर असे पूर्ण महिनाभर त्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी थांबत होते व त्या काळी या मनोरंजनाच्या माध्यमांना अलोट गर्दी होत असे परंतु कालांतराने तमाशा सोडला तर आज टुरिंग टाकीजचा प्रेक्षक वर्ग कमी झाला आहे.पूर्वी हा प्रेक्षक वर्ग सुध्दा आवर्जून यात्रा ठिकाणी दहा ते बारा किलोमीटर मिळेल त्या वाहनाने किंवा बैलगाडीने चित्रपट पाहण्यास यायचा परंतु सध्याच्या डिजिटल युगात करमणुकीसाठी घरोघरी टेलीव्हिजन, मोबाईल, संगणक आदि अत्याधुनिक साधने आल्याने पारंपारिक असणारी यात्रेतील मुख्य करमणुकीचे साधन म्हणून ओळखली जाणारी टुरिंग टाकीजकडे प्रेक्षकांचा कल कमी झाल्याने टुरिंग टाकीज व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाचे असतीत्व टिकून ठेवणे मात्र जिकरीचे झाले आहे.

सालाबादाप्रमाणे एरंडोल येथील नथ्थू बापू उर्स निमित्त जालना येथील टुरिंग टाकीजचे आगमन झाले आहे परंतु प्रेक्षक वर्गानी मात्र या टुरिंग टाकीजकडे पाठ फिरवली आहे.अगोदर एरंडोल शहरात एक बंधिस्त व एक खुले चित्रपट गृह होते. परंतु ते सुद्धा प्रेक्षका अभावी गेली दहा ते बारा वर्षापासून बंद झाली आहेत. तसेच भविष्यात फिरते चित्रपट गृह देखील लुप्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.