मल्लिका व साइरिल या दोघांवर कथितरित्या पॅरिसस्थित अपार्टमेंटचे 80 हजार युरो म्हणजे सुमारे 64 लाख रुपये भाडे थकीत होते. अखेर भाडे मिळत नसल्याने घरमालकांनी या दोघांनाही घरातून बाहेर काढले. त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लिका व साइरिल दोघेही आर्थिक तंगीत आहेत. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तीन बुरखेधारी युवकांनी मल्लिकासोबत लुटमार केली होती. तेव्हापासून मल्लिका व साइरिल यांनी घराचे भाडे भरलेले नाही. अर्थात मल्लिकाने हे वृत्त धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे. पॅरिसमध्ये माझे कुठलेही अपार्टमेंट नाही. कुणी मला गिफ्ट करू इच्छित असेल तर पत्ता पाठवा, असे टि्वट तिने केले आहे.
मल्लिका पॅरिसच्या 16th arrondissement भागात राहते. हा पॅरिसचा सर्वाधिक पॉश भाग आहे. या भागात ‘थंडरबाल’ व ‘लास्ट टेंगो’ यासारख्या चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. मल्लिका दीर्घकाळापासून साइरिलसोबत राहत आहेत. या दोघांनीही सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा मध्यंतरी होती. अर्थात मल्लिकाने या सगळ्या चर्चा अफवा असल्याचे सांगत अफवा पसरवणे बंद करा, असे म्हटले होते. ज्यादिवशी मी लग्न करेल, त्यादिवशी मी सर्वांना निमंत्रित करेल, असेही तिने स्पष्ट केले होते. मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटिक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर 2016 मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती. ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय.
पहिल्या चित्रपटात मल्लिकाने तिचे मूळ नाव रीमा लांबाच लावले होते. पण ‘मर्डर’ सिनेमापासून तिने रीमा लांबा नाव लावणे बंद केले. तिने आपल्या आईचे शेरावत हे आडनाव वापरण्यास सुरुवात केली. आईने चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी जो पाठिंबा दिला त्यासाठी मल्लिकाने शेरावत नाव धारण केले. बॉलिवूडमध्ये येण्याआधी मल्लिकाचे लग्न झाले होते. यानंतर दोघांचा घटस्फोटही झाला. तेव्हापासून मल्लिका सिंगल आहे.