मल्ल्याला ब्रिटन कोर्टाचा दणका; तिहार जेल सुरक्षित

0

लंडन : बँकांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट’ विजय मल्ल्याला ब्रिटन कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. भारतातील जेल असुरक्षित असल्याची ओरड करणाऱ्या विजय मल्ल्याचा हा दावा ब्रिटन कोर्टाने फेटाळून लावत दिल्लीतील तिहार जेल सुरक्षित असल्याचे ब्रिटन कोर्टाने म्हटले आहे. ब्रिटन कोर्टाच्या या निर्णयामुळे विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

लंडन हायकोर्टाचे न्यायाधीश लेगाट आणि न्यायाधीश डिंगेमॅन्स यांच्या खंडपीठाने शुक्रवारी हा निर्णय दिला. तिहार जेलमध्ये असलेले भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक संजीव चावला यांच्या जीवाला भारतात कोणताही धोका नाही. संजीव चावला यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच फिक्सिंगचा आरोप असून माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह संजीव चावला यांची यात नावे आहेत. चावला सध्या तिहार जेलमध्ये आहे. चावला यांच्या उपचाराची भारताने हमी दिल्यानंतर लंडन हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. लंडन हायकोर्टाच्या या निर्णयामुळे विजय मल्ल्याच्या अडचणी वाढणार आहेत.