मल्ल्याविरोधात आरोपपत्र दाखल

0

नवी दिल्ली-देशातील बँकांची फसवणूक करून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग तसेच बँकांना ६ हजार २७ कोटी रूपये बुडविल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्राच्या आधारे न्यायालय फरार आर्थिक अपराधी अध्यादेशा अंतर्गत मल्ल्या आणि त्याच्या कंपनीची नऊ हजार कोटी रूपयांहून अधिक किमतीची संपत्ती जप्त करण्याची परवानगी मागू शकेल. ईडीने आतापर्यंत याप्रकरणी ९,८९० कोटी रूपयांची संपत्ती जप्त केलेली आहे.