मल्ल्यासाठी लंडनमध्ये ईडी, सीबीआय चा सापळा

0

नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्ल्याची अडचणीतून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मल्ल्याविरोधात पुढील कारवाई करण्यासाठी ईडी आणि सीबीआयची टीम चार्जशीट घेऊन लंडनला पोहोचली आहे. ईडीच्या दोन सदस्यांची टीम प्रत्यार्पणची याचिका लंडनच्या अधिकार्यांसमोर सादर करणार आहे. ईडीच्या टीमसाबेत सीबीआयचे अधिकारीही आहेत.

ईडीचे अधिकारी मल्ल्याच्या विरोधातील अनेक पुराव्यांसह पाच हजार पाचशे पानांची चार्जशीट घेऊन लंडनला गेली आहे. सीबीआयने यापुर्वी अनेक कागदपत्रे लंडनच्या न्यायालयात सादर केली आहेत. तसेच सीबीआयने आधीच मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणी अपीलदेखील केले आहे. सध्या याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.

विजय मल्ल्या विविध बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून लंडनमध्ये गेले आहेत. ईडीने अनेकदा समन्स पाठवूनही मल्ल्या भारतात परतलेला नाहीत. शिवाय न्यायालयाने हजर राहण्यास सांगूनही वेगवेगळी कारणे देत मल्ल्या न्यायालयासमोर हजर राहिलेला नाही.