मविप्रवर अखेर भोईटे संचालक मंडळाचा ताबा

0

पोलीस बंदोबस्तात कार्यालयातून कामकाजाला सुरुवात ः तहसीदार अमोल निकम यांचे आदेश

जळगाव : तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशाने शनिवारी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या मुख्य कार्यालयात भोईचे गटाच्या संचालक मंडळाने प्रवेश करून संचालक मंडळाच्या कामकाजाला सुरूवात केली. दरम्यान अनुचित प्रकार अथवा घटना घडू नये म्हणून संस्थेच्या मागणीनुसार शनिवारी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी समर्थकांनी घोषणाबाजी करत या निर्णयाचे स्वागत केले.

मविप्र मुख्य कार्यालयाचा कब्जा संदर्भात जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी सीआरपीसी 145 अन्यये दि. 21 जून 2018 रोजी प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावावर तहसिलदार यांच्या न्यायालयात वेळोवेळी सुनावणी होऊनही दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुण घेतल्यानंतर 07 डिसेंबर रोजी सामील सर्व आदेश, पुरावे, व वस्तुस्थिती लक्षात घेऊन संस्थेच्या मुख्य कार्यालयावर पार्टी नं. 1 यांचा ताबा दिसून येत असल्याचे म्हटले आहे. पार्टी नं. 1 चे संचालक मंडळात निलेश भोईटे हे मानद सचिव असून त्यात त्यांचा संचालक मंडळाचा समावेश आहे. तहसिलदार यांच्या आदेशाचा निक ाल जिल्हापेठ पोलिसांना प्राप्त झाला असून आज सायंकाळी भोईटे गटाच्या संचालक मंडळाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी समर्थकांसह पोलिसांच्या  साक्षीने मुख्य कार्यालयात प्रवेश केला. संचालक मंडळाने कामकाजास सुरूवात केली, अशी माहिती मानद सचिव निलेश भोईटे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.