भडगाव । जळगाव शाखेतर्फे नववर्षाच्या पुर्वसंधेला भडगाव तहसील आवारातून राष्ट्रपीता महात्मा गांधी अहिंसा मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी शाहीर परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील, पोनि डी.के.परदेशी, तहसीलदार सी.एम.वाघ, भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, नायब तहसीलदार अमित, आरपीआय तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, हवलदार रमेश पाटील आदी उपस्थित होते. अहिंसा हा राष्ट्रपीता महात्मा गांधी यांचा मुलमंत्र असून कोणत्याही मुळचा प्राण्याची हत्या करुन जीवाची चंगळ करणार्या तरुणाईने स्वत:ला सावरुन तसेच मद्यपानापासून लांब राहणे गरजेचे आहे.
यांची होती उपस्थिती
यासाठी निषेध म्हणून या रॅलीचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असल्याचे शाहीर शिवाजीराव पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले. रॅलीमध्ये शाहीर नामदेव पाटील, रामसिंग राजपूत, बाबुराव मोरे, भावराव जाधव, योगेंद्र राऊळ, सुरज राऊळ, परशराम सुर्यवंशी, प्रभाकर मोरे इत्यादी कलावंतासह अनेक ग्रामस्थ व नागरिक उपस्थित होते.