मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होत असेल तर कारवाई करावी- एनजीटी

0

नवी दिल्ली-राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) पूर्व दिल्लीमधील सात मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असलेची तक्रारी करण्यात येत आहे. या तक्रारींची तपासणी करण्याचे आदेश दिला आहे. एनजीटीने दिल्ली सरकारसहित दिल्ली आणि केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळांना या मशिदींची पाहणी करण्याचा आदेश दिला आहे. जर खरंच या मशिदींमुळे ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.

स्वयंसेवी संस्था अखंड भारत मोर्चाने ही याचिका दाखल केली आहे. या मशिदी अशा परिसरात आहेत जिथे शाळा आणि रुग्णालये आहेत. लाऊडस्पिकरचा आवाज हा मर्यादेपेक्षा जास्त असतो असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

एनजीटी अध्यक्ष जस्टिस आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने मशिदींकडून होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी मिळूनही दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही यावर आश्चर्य व्यक्त केले.