साक्री : रात्री 8 वाजता साक्री आगारातून सुटणारी साक्री-पुणे एसटी बसचे तिकीट काढण्याचे मशीन नादुरुस्त झाल्याने बस साक्री शहरातील तहसील कार्यालयासमोर काही वेळ रोडावर थांबल्याने प्रवासी संतप्त झाले. उन्हाळी सुट्टी असल्याने प्रावाशीची प्रचंड गर्दी एसटी बसमध्ये दिसून येत आहे, रातराणी बस असल्याने पुणे जाणाऱ्यांची संख्या एसटी बसमध्ये जास्त होती व मशीन नादुरुस्त झाल्याने बस थांबल्याने प्रवाशी घामाने ओले झाले. साक्री आगारात प्रवाशीची वाढती गर्दी पाहून मशीन पूर्ण पणे चार्ज होत नसल्याने वाहकाला प्रवाशीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. साक्री-पुणे बसचे मशीन नादुरुस्त झाल्याने आगारात कळविण्यात आले व काही वेळ नंतर दुसरे मशीन मागविण्यात आले व बस पुणे कडे रवाना झाली.