JDC Bank undervalued Masaka sale! फैजपूर (निलेश पाटील) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मधुकर कारखान्याचे मूल्यांकन अत्यंत कमी व खोटे दाखवून मधुकरची अवघ्या 63 कोटी रुपयांमध्ये विक्री केली असल्याची तक्रार सभासद रमेश चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांसह जेडीसीसी बँकेला 16 सप्टेंबर 2022 रोजी मेल द्वारे तक्रार केली आहे.
कर्ज थकबाकीमुळे मसाकाची विक्री
जळगाव जिल्ह्यातील 40 वर्षांपासून सतत गाळप करणारा मधुकर सहकारी कारखान्याचे कर्ज थकल्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सीकृडायजेशन कायद्यान्वये ताब्यात घेतला आहे. तत्पूर्वी सदर कारखाना भाडे तत्वाने चालवायला देण्याबाबत अथवा सहयोगी तत्वाने चालविण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाने तील वर्षापूर्वी परीसरातील लोकप्रतिनिधी, आजी माजी संचालक यांच्याशी चर्चा करून कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी विषय ठेवला. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना भाडे तत्वाने चालवायला देण्यासाठी अथवा सहयोगी तत्वाने चालविण्यास देण्यासाठी एकमताने ठरावाला मंजुरी दिली.
मूल्यांकन कमी दाखवल्याचा आरोप
जळगाव जिल्हा मध्य सहकारी बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेचे ताब्यात घेऊन विक्री करण्यासाठी काढलेल्या निविदेमध्ये राखीव किंमत 62.6012 कोटी रुपये दर्शवली आहे. यामध्ये कारखान्याची राष्ट्रीय महामार्गावरील 68 एकर जमीन 2500 टनी साखर कारखाना, अद्यावत 30 ज्ञश्रवि क्षमतेची डिस्टलरी, मिथेन गॅस, उत्पादन प्रकल्प, डिझेल पंप, गोडाऊन इत्यादींचा समावेश आहे. जेडीसीसी बँकेने मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची केलेले मूल्यांकन हे पूर्णपणे खोटे व कमीत कमी दाखवले असल्याचे तक्रार रमेश चौधरी यांनी केली आहे.
कारखान्याच्या जमिनीचे मूल्य 95 कोटी रुपये
बँकेने विक्री करावयाचा मालमत्तेमध्ये कारखान्याची 68 एकर जमिनीचा समावेश आहे. कारखान्याच्या परीसरातील राज्य महामार्गावरील जमिनीचे व्यवहार मागील वर्षी जवळपास साडेती.न लाख रुपये प्रती गुंठा दराने (एकरी 1.40 कोटी) झालेले आहेत. हा दर विचारात घेतला असता केवळ कारखान्याच्या 68 एकर जमिनीचीच किंमत 95 कोटी रुपयांची होते. तर जेडीसी बँकेने इतके कमी मुल्यांकन दाखवून मधुकर विक्रीची लगीन घाई का केली? तसेच मधुकर सहकारी कारखान्याकडे अनुपयोगी 75 एकर जमीन आहे. कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळांनी यापैकी काही जमिनीची विक्री केली असता तर यातूनच जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज फिटले असते पण बँकेने अनुपयोगी जमीन न विकता प्रकल्प विक्रीसाठी बँकेच्या ताब्यात देणे त्यांच्याविषयी संशयाची सुई गडद करीत आहे या विक्रीमागे जेडीसीसी बँकेचा नेमका हेतू काय? असा प्रश्न आहे.
अत्यंत घाई-घाईने मालमत्ता विक्रीचा निर्णय
राज्यातील सहकारी कारखाने विक्री न करता भाड्याने देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण असताना बँकेने भाड्याने देण्याबाबतची कोणतीही कार्यवाही न करता अत्यंत घाईघाईने कारखान्याच्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी केवळ दोन महिन्यात दोन निविदा प्रकाशित केल्या. जेडीडीसी बँकेने इतक्या घाईघाईने मधुकरची विक्री करण्यामागचा हेतू काय? हा संभ्रम निर्माण झाला आहे.