फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखाना गेला 42 वर्षांपासून अखंडपणे असलातरी गेल्या दोन तेच चार वर्षांपासून साखरेचे भाव घसरल्यामुळे या वर्षा कारखाना आर्थिक् अडचणीत सापडला आहे. कारखाना कार्यक्षेत्रात 430 हेक्टर ऊस उभा असून तो गाळप होणे शेतकरी व कामगार हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे पूर्व हंगामी कर्जाची देणी देणेसाठी अंतरीम कर्ज देण्यासाठी जिल्हा बँकेला तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कर्ज पुरवठा मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना साकडे घालण्यात आले. राज्य सरकारने थकहमी द्यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, मसाका चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. कारखान्याच्या सर्व परीस्थितीचा आढावा निवेदनाव्दारे मांडून सविस्तर चर्चा करण्यात आली
समस्येतून मार्ग काढण्यासाठी व्यापक धोरण तयार रकणार
शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील इतर कारखान्यांचीदेखील अशीच अवस्था आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सरकार व्यापक धोरण तयार करीत असून त्यात मधुकरचाही समावेश करण्यात येईल. कारखान्याला निश्चितच अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मार्ग काढू, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहकार मंत्री सुभाष व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेटी घेऊन चर्चा करण्यात आली.