फैजपूर। मांजरी (पुणे) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटतर्फे 4 ते 8 जुलैदरम्यान ऊस शेती ज्ञानयाग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागासाठी मसाकाने 10 शेतकर्यांना नुकतेच रवाना केले. या वेळी चेअरमन शरद महाजन, मिलिंद नेहेते, सचिव तेजेंद्र तळेले, के.डी. भंगाळे, व्ही.एम. पाटील, गिरीष चौधरी, किरण खाचणे, हरिदास हरणकर आदींची उपस्थिती होती.
वृक्षारोपण मोहिमेत घेतला सहभाग
तसेच मधुकर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेत कारखाना परिसरात रोपे लावली. संचालक कर्मचारी उपस्थित होते.