फैजपूर:- मधुकर सहकारी साखर कारखान्याने बिकट परिस्थितीवर मात करीत दोन लाख 18 हजार 300 मे.टन ऊसाचे यशस्वीरित्या गाळप केले तर एक लाख 94 हजार 225 क्विंटल साखर उत्पादीत केल्यानंतर 42 व्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता झाली. साखरेचा उतारा 8.90 टक्के आला असून सन 2017-18 चा गाळप हंगामाचा ऊस तोड व वाहतूक उपसमितीचे चेअरमन अनिल रामचंद्र महाजन यांच्या हस्ते समारोप करण्यात आला. यावल-रावेर तालुक्यातले ऊस उत्पादक उपस्थित होते.