मसाज पार्लरच्या नावाखाली चाललेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

0

पुणे – बाणेर परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा-मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ तरुणींची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये थायलंडच्या ५, तर एका भारतीय तरुणीचा समावेश आहे. यावेळी मसाज पार्लर चालकासह त्याच्या दोन साथीदारांना अटक कण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत शिवाजी जगदाळे (वय २५, टिंगरेनगर धानोरी), अलीहुसेन नथानी (मूळ रा. बांद्रा मुंबई), काकूसिंग चंद्रसिंग जयगडी (वय २६, मूळ नेपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत जगदाळे हा त्याचा साथीदार अलीहुसेन नथानी याच्यासोबत मिळून बाणेर परिसरातील बाणेर-औंध लिंक रोड येथील एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये स्पा मसाज पार्लर चालवत होता. तर काकूसिंग जयगडी हा या मसाज पार्लरचे दैनंदिन काम पाहत असे. अनिकेत जगदाळे व त्याचे साथीदार बाणेर परिसरातील औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील या उच्चभ्रू सोसायटीमध्ये असलेल्या बंगल्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कर्मचारी संजय गिरमे यांना मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला.

दरम्यान, तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी चौकशी केली असता सेक्स रॅकेट चालवत असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास केला असता टुरिस्ट व्हिसावर आलेल्या ५ थायलंडच्या तरुणी आणि १ भारतीय तरुणींकडून येथे वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले. या सहा विदेशी आणि पाच भारतीय मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. त्यांना संरक्षणकामी ताब्यात घेतले असून, अटक केलेल्या तिघांवरही गुन्हा दाखल करून त्यांना पुढील तपासासाठी चतु:शृंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? आरोपींचे इतर ठिकाणी मसाज पार्लर आहे का? अश्या अनेक प्रश्नांचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे,सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले,संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक सी. व्ही. जाधव, पोलिस कर्मचारी संजय गिरमे, तुषार आल्हाट,नितीन तेलंगे, विजय काळे, म्हेत्रे, लोहकरे, महिला पोलिस कर्मचारी येळे, नलावडे, चांदगुडे यांनी केली.