मस्करीचा वाद विकोपाला, अटवाडेत दोन गटात दंगल

0

भुसावळ। रावेर तालुक्यातील अटवाडे येथे मस्करीचा वाद विकोपाला गेल्याने दोन गटात दंगल उसळली. लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने एका गटातील एक जण गंभीर जखमी झाला असून त्यास जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. दोन्ही गटाच्या 20 आरोपींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल होवून आठ जणांना अटक करण्यात आली.

दोन्ही गट समोरा-समोर भिडले
अटवाडे येथील केळी ग्रुपच्या ओट्यावर दोन गटांमध्ये किरकोळ मस्करीचा वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गट समोरा-समोर भिडले. या हाणामारीत एक जण जखमी झाला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पहिल्या गटाचे शेख सुपडू शेख हैदर यांनी तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी संतोष काशीनाथ भोलाणे, गोलु भागवत कोळी, योगेश महाजन, रवी आत्माराम कोळी, प्रकाश बाजीराव कोळी, ज्ञानेश्‍वर पाटील, रमेश वामन चापोरकर (महाजन), प्रवीण वाल्मीक कोळी, मनोज तुकाराम कोळी, अविनाश बळीराम कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात शेख हैदर शेख मोती हे जखमी झाल्याने त्यांना जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.

संशयीतांविरुध्द गुन्हा दाखल
दुसर्‍या गटातर्फे संतोष काशीनाथ भोलाणे यांनी तक्रार दिल्यावरून संशयीत आरोपी शेख नईम शेख सलीम, शेख सलीम शेख गनी, शेख करीम शे.अब्दुल, शे.मुसा शे.ईसा, करीम मिया, अब्दुल शेखर मोती, शेख हासीम शे.कलीम, शेख सद्दाम शेख भुरा, शेख हैदर शे.मोती, शेख सुपडू शे.हैदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर फडतरे अधिक तपास करीत आहेत.