भोसरी : दहा महिन्यापूर्वी केलेल्या मस्करीच्या रागातून चौघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्रे तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्राच्या सुमारास दिघी येथे घडली. संतोष भानुदास जांभूळकर (वर 27, रा. खेड. मूळ या. बुगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांनी याप्रकरणी भोसरी एमआरडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानुसार सचिन मोहिते व त्यांच्या तीन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळकर आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत. जांभुळकर यांनी सचिन राची 15 जानेवारी 2018 रोजी मस्करी केली. याचा राग मनात धरून सचिन राने दहा महिन्रानंतर 15 ऑक्टोबर 2018 रोजी जांभुळकर रांना दिघी येथील सुनील नगर मोशी येथील एका बंद पडलेल्या बांधकामावर नेऊन शिवीगाळ करत लाथा बुख्यांनी मारहाण केली. या भांडणात सचिन राने सिमेंटचा गट्टू जांभुळकर यांच्या छातीवर व डाव्या कानावर मारला. यामध्ये जांभुळकर गंभीर जखमी झाले. मारहाण केल्यानंतर सचिन राने जांभुळकर यांना ’पोलिसात तक्रार केल्रास तुझ्राकडे बघून घेतो’ अशी धमकी दिली. यावरून एमआरडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआरडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.