मस्कावदसीमच्या शेतकर्‍याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

0

सावदा- जवळच असलेल्या मस्कावद येथील शेतकर्‍याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. 19 रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी ही घटना घडली. गिरीश उर्फ गुणवंत धनराज सरोदे (29) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. शेतकर्‍याने आत्महत्या केली की त्यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला? याबाबत कारणांचा शोध सावदा पोलिसांकडून घेतला जात आहे. प्रमोद गणेश सरोदे (54, रा.शेती म्हस्कावद सीम) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार नामदेव चव्हाण करीत आहेत.